कमळगड आणि बरेच काही....
नमस्कार, दर वेळी काही तरी नवीन... ब्लॉग लिहिणे खरंचच सोपे नाही.. यावेळी घेतलेला अनुभव. क्षणभरासाठी डोळ्यात पाणी आणणारा, विचार करायला लावणारा होता. यासगळ्या गोष्टी मी अनुभवल्या. अर्थात निम्मित्त आमचा JPP पालक किल्ले भ्रमंती गट. किल्ले भ्रमंती गटावर नियोजन मंडळाचा मेसेज आला. यावेळी कमळगडचा ट्रेक करायचा. ग्रुप तयार झाला. वय सांगून, गाडी बुक झाली. ट्रेक चे नियोजन होऊन आम्हाला अंदाजे वेळापत्रक पाठवले गेले.... आणि आम्ही तयारीला लागलो. 🎒🦯🧢🥾 रविवारी पहाटेच आम्ही निघालो ट्रेकला. सकाळचे शांत आणि नयनरम्य वातावरण , आजुबाजूला शेती, मोर, धोम धरण आणि गावाकडची सकाळी. अहाहा! ७ बाबा पालक आणि मी ८ वी. एवढीच काय ती संख्या. AC बस मधून ट्रेक ला निघालेलो आम्ही. सकाळी ६.३० वाजता न्याहारी करण्यासाठी थांबलो. ( ताकाचे सांगू काय 🤫) वाई मधून वाट काढत धोम धरणाला वळसा घालून आम्ही पुढे आलो. एका आश्रमाजवळ गाडी थांबवून चढायला सुरुवात केली. चढता चढता पुढे आलो आणि सहज सोपा वाटणारा हा गड चढताना मला मात्र दिवसा तारे दाखवून गेला. मलाच उन्हामुळे त्रास सुरू झाला....मग काय हळूहळू पुढे निघालो. पुढे वाटेत ...