...................द्वंद्वयुद्ध.................
मन १ : काय decision झाला तुझा? जाणार का सुधागडावर? मन २ : हो बहुतेक जाईन म्हणतो. विचार चालू आहे. मन १ : अरे कुठे त्या चिखलात जातोस एवढा वरतून rain सुरू आहे. त्यातून कोकणात तर मुसळधार असेल नुसती चीक चीक ..... मन २ : अरे धरणीला पाऊस भेटायला आल्यावर आनंद होऊन ती थोडे रूप बदलते एवढेच आणि चिकचिक कसली...पावसात भिजून तर बघ काय मजा... . . . . . मन १ : स्वतःची गाडी घे. मजा येईल. पाहिजे तिथं पाहिजे तसं भटकता येईल. मन २ : अरे सगळ्यांबरोबर जाण्याची मजाच वेगळी. गाडीमध्ये आरोळ्या ठोकत, दंगा करत जाण्याची मजाच वेगळी. मन १ : अरे काय तेच तेच चेहरे बघायचे परत त्यात काय आले नवीन. डोंबल. मन २ : अरे तीच लोक असली तरी त्यांचे अनुभव वेगवेगळे. ते अनुभव ऐकण्यात खूप मजा येते आणि खूप काही शिकता येते. आता मिलिंद दादा आणि थोरात दादांनी किती छान माहिती दिली. किती काय काय गोष्टी कळल्या. . . . . मन १ : अरे काय हे paper dish मध्ये पोहे खायचे... Breakfast कसा.... bread jam butter असा मस्त हवा. मन २ : गप रे. या पावसाळी वातावरणात सकाळी न्याहरीमध्ये गरम चहा बरोबर कांदा पोहे खाण्याची मजा तुला नाही कळणार. . ....