...................द्वंद्वयुद्ध.................
मन १ : काय decision झाला तुझा? जाणार का सुधागडावर?
मन २ : हो बहुतेक जाईन म्हणतो. विचार चालू आहे.
मन १ : अरे कुठे त्या चिखलात जातोस एवढा वरतून rain सुरू आहे. त्यातून कोकणात तर मुसळधार असेल नुसती चीक चीक .....
मन २ : अरे धरणीला पाऊस भेटायला आल्यावर आनंद होऊन ती थोडे रूप बदलते एवढेच आणि चिकचिक कसली...पावसात भिजून तर बघ काय मजा...
.
.
.
.
.
मन १ : स्वतःची गाडी घे. मजा येईल. पाहिजे तिथं पाहिजे तसं भटकता येईल.
मन २ : अरे सगळ्यांबरोबर जाण्याची मजाच वेगळी. गाडीमध्ये आरोळ्या ठोकत, दंगा करत जाण्याची मजाच वेगळी.
मन १ : अरे काय तेच तेच चेहरे बघायचे परत त्यात काय आले नवीन. डोंबल.
मन २ : अरे तीच लोक असली तरी त्यांचे अनुभव वेगवेगळे. ते अनुभव ऐकण्यात खूप मजा येते आणि खूप काही शिकता येते. आता मिलिंद दादा आणि थोरात दादांनी किती छान माहिती दिली. किती काय काय गोष्टी कळल्या.
.
.
.
.
मन १ : अरे काय हे paper dish मध्ये पोहे खायचे... Breakfast कसा.... bread jam butter असा मस्त हवा.
मन २ : गप रे. या पावसाळी वातावरणात सकाळी न्याहरीमध्ये गरम चहा बरोबर कांदा पोहे खाण्याची मजा तुला नाही कळणार.
.
.
.
.
.
मन १ : झाली का start? बघ तो प्रबोधिनी चा अमित मागे राहतो आहे. काही जण पुढे काही मागे काही coordination नाही तुमच्यात.
मन २ : अरे प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी. त्याप्रमाणे प्रत्येक जण निसर्गाचा आनंद घेत गड चढत आहे. आणि गड चढताना पुढे राहिले म्हणजेच आपण गटाचे नेतृत्व केले असे नाही तर सर्वांना प्रोत्साहन देत सर्वांना बरोबर घेऊन जाणे यातच खरे कौशल्य आणि तेच तो अमित आणि मिलिंद दादा मागे राहून करत आहेत. आणि हो फरक कितीही असला तरी उत्साह सगळ्यांचा सारखाच हो.
मन १ : पण जाम exhausting होतंय रे
मन २ : दम थोडा लागणारच. पण त्या बरोबर ही शुद्ध तुझ्या फुफ्फुसात जातीय हे बघ. तुमच्या शहरात मिळणार आहे का अशी हवा.
.
.
.
.
मन १ : My God, काय stairs आहेत. जाऊदे नको जायला पुढे.
मन २ : यातच खरा रोमांच आहे. ती जुनी शिडी बघ मग त्यामानाने हे सोपेच आहे की.
.
.
.
.
मन १ : दमलो यार. थोडे ते Electrolyte दे रे किंवा Glucon D दे.
मन २ : ते बघ योगेशने सरबत सांगितले आहे. जीरा पूड टाकून काय मस्त लागत आहे हे सरबत... अम ट च...
.
.
.
.
.
मन १ : अरे हे काय rain आला बघ.
मन २ : मग भिज की या पावसात. या पावसामुळे तर समोर तुला हा सुंदर नजारा दिसत आहे. त्या पावसामुळेच तर सगळे डोंगर हिरवेगार दिसत आहेत. खाली नदी खळखळ करून वाहत आहे.
.
.
.
.
मन १ : Mobile वर songs लाव ना.
मन २ : हे निसर्गाचे गाणे ऐक. पक्ष्यांचा आवाज, झाडांचा सळसळता आवाज, धबधबे नदी यांच्या पाण्याचा आवाज हे काय कमी आहे???
.
.
.
.
.
मन १ : आलो बाबा एकदाचे. Lunch सांग यार.
मन २ : थोडा गड तर बघून घेऊ. ते बघ किती छान तळे आणि त्याशेजारीच महादेवाचे मंदिर. ते बघ देवीचे मंदिर. किती छान ठेवले आहे नाही. आणि त्या बाजूला किती वीरगळ आहेत. आपल्या पराक्रमी पूर्वजांनी येथे रक्त सांडले त्याची निशाणी. नुसते एवढेच नाही ते बघ महाद्वार किती छान. इकडून सवाष्णीचा घाट लागतो म्हणे. काय तटबंदी बांधली आहे आणि ही चोर वाट अहाहा...
.
.
.
.
मन १ : खाली floor वर काय बसतो. घाण लागेल. आणि हे काय.. त्यांना table dish spoon सांग आणायला.
मन २ : ही जमीन शेणाने सारवलेली आहे. त्यावर बसायला काहीच हरकत नाही. केळ्याच्या पानावर जेवणाची मजाच वेगळी. इथे ताट चमचे करायचे काय. हाताने मस्त जेवायचे आणि म्हणायचे आम्ही जेवणावर आडवा हात मारला.
.
.
.
.
मन १: मग थोडा bread किंवा pasta तरी आणायला सांग रे.
मन २ : ही गरम तांदळाची भाकरी, बटाट्याची भाजी, मूग उसळ, लोणचे, आमटी भात खाऊन तर बघ. स्वर्गीय सुख म्हणजे काय ते तुला कळेल.
.
.
.
.
मन १ : झाला ना slip. सांगत होतो.
मन २ : अरे घसरणे होणारच. काही लागले तर नाही ना.....
.
.
.
.
.
मन १ : आलो बाबा एकदाचे खाली. चल आता quickly घरी जाऊ.
मन २ : थांब जरा. आपण प्रबोधिनीच्या पालकांबरोबर आलेलो आहोत. आता प्रार्थना म्हणू आणि मगच बस मध्ये बसू.
.
.
.
मन १ : आता एक sleep काढतो.
मन २ : अरे झोपतोस काय. आपण ताम्हिणीतून वरती चाललो आहोत. आजूबाजूला बघ किती छान निसर्ग दिसत आहे. आता हे डोळ्यात साठवून तर घे..... थोड्या वेळाने आपण पुण्यात पोहोचणारच आहोत.
मन १ : .....
मन २ : .....
मन १ : .....
मन २ : ....
यांचे द्वंद्व असेच चालू राहणार आहे. पण यात कोण जिंकणार? तुमचे मन काय सांगते हे नक्की कळवा.
केयूर कानडे
©kkdhanashree
Comments
Post a Comment