कोरोना कोरोना

   

कोरोना कोरोना काय सांगू तुला, तू जगणे शिकवले मला!

अचानक एके दिवस या जगात तू अवतरलास, सुरुवातीला काय हे समजले नाही आम्हाला,

हळू हळू पाय पसरलेस तू या जगात,
हाहाकार मजवल्यास पटपट तू सर्वात,

अरे ए कोरोना, अरे काय तुला म्हणू?
जगणे केले अवघड सगळ्यांचे तू,

थाळ्या वाजल्या, दिवे लागले तरी तू जाईन, सर्वत्र पसरून मजा तुला तरी येईन,

अजुन अजुनचा हव्यास नाही रे बरा
पण आता तू जाणेच योग्य हाच मार्ग खरा

सुरू झाली मग लसची गडबड,
काही वेळासाठी हादरलास पण तुझी सुरूच पळापळ,

इकडून तिकडे वाढतच तू जातो आहेस,
कसे थांबवावे तुला , सगळ्यांना कळतच नाहीये

बास रे बाबा तुझं , खूप झाला कहर,
आता बंद कर तुझी वाढत जाणारी सफर

होत जातो आहोत आम्हीच यात सफर
कोरोना कोरोना थांबावं तुझा कहर

©kkdhanashree

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद