ये तारा वो तारा हर तारा देखो जीसे भी लगे प्यारा...

 ये तारा वो तारा हर तारा देखो जीसे भी लगे प्यारा...⭐⭐

समोरचे काजव्यांचे चमचमणे पाहिले आणि हेच गाणे आठवले...

अहो निमित्त होते.. राजमाचीचा ट्रेक आणि ट्रेल.....हो हो ट्रेक कम ट्रेल म्हणा ना...

यावेळी जरा पालक संघाने राजमाची आणि काजवे निरीक्षण असे काहीसे ठरवले होते. 

कोण येणार म्हणून पोल घेताना ४५ चा आकडा होता पण प्रत्यक्षात हा १३ जणांनी पूर्ण केला.

काय सांगता अहो खरचं! खूपच मज्जा आली. लोणावळ्यातील फणासराईला आलो. गाड्या पार्क केल्या आणि तिथून निघून आम्ही जवळ जवळ ८-१० किलोमीटर चालत चालत उभेवाडीला पोहोचलो. जाता जाता रस्त्यात करवंदांचा आस्वाद घेत, मनसोक्त गप्पा मारत मारत आम्ही गेलो आणि आजूबाजूचा नजरा निसर्गाचा हो! 🤩बघत बघत गेलो....

जेवण केले आणि काजवे बघायला गेलो तर....

"ये तारा वो तारा हर तारा देखो जीसे भी लगे प्यारा......." हेच गाणे आठवले...

डोळ्याचे पारणे फेडणारे ते क्षण...सर्वत्र निरव शांतता आणि त्यात समोरच्या झाडाकडे टक लावून काजवे पाहणारे आम्ही... अहाहा! टीमटीम टीमटीम चमकणारे काजवे. एक भन्नाट अनुभव आहे बरं का हा!... एकदा तरी सगळ्यांनी घ्यावाच असा...

रात्री साधारण तासभर भरपूरच पाऊस झाला. धोधो कोसळणारा पाऊस⛈️ आपले अस्तित्व दाखवणारा होता हे समजत होते.

दुसऱ्या दिवशी मात्र स्वर्गात आहोत😍 याचा अनुभव आम्ही श्रीवर्धन गडावर जाऊन घेतला. सगळीकडे ढग पसरलेले आणि त्यात गड पहाणे, मज्जा येत होती. मुक्तहस्ते निसर्गाची उधळण पाहत आम्ही हे सारे डोळ्यात साठवून घेत होतो. ढग दऱ्याखोऱ्यातून वरखाली करत खेळण्यात गुंग होते. मध्येच समोरच्या डोंगरातून झुकझुकगाडी 🚂स्वतःची शिट्टी वाजवून मी आहे हे सांगत होती.सोबत मिलिंद दादा गडाची, आजूबाजूला दिसणाऱ्या गडांची माहिती सांगत होतेच. आम्ही आपले बापडे गड बघ्याचा आनंद घेत हे सगळं अनुभवत होतो.

श्रीवर्धन आणि मनरंजन हे शेजारी शेजारी असणारे गड. अगदी सख्खे शेजारी. दोघांच्या मध्ये एक भैरवनाथाचे मंदिर. त्यात पावसाची कृपा म्हणून....हो ना पावसाने जराशी झलक दाखवून विश्रांती घेतली आणि आमचा ट्रेक कम ट्रेल पूर्ण झाला. 

माची वरचा बुधला हे सगळ्यांनी वाचलेच असेल त्या बुधलाच्या घरीच आम्ही राहिलो. त्याचे वंशज तिथे येणाऱ्या सगळ्यांची राहायची ⛺खाण्यापिण्याची सोय करतात. सकाळी गडावरची भ्रमंती झाली आणि मग निघालो परत चालत चालत तेवढेच अंतर कपात करवंद खात खात, रस्त्यातील चिखलाने बरबटलेला मातीचा रस्ता पार करत करत आम्ही परत आलो. पावसाळ्याच्या सुरवातीचा हा ट्रेक कम ट्रेल एकदम नवीन स्फूर्ती देऊन गेला असे वाटले हे नक्की

©kkdhanashree 

Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद