दिवाळी
दिवाळी दिवाळी दिवाळी.....💫✨
काल माळा साफ करताना कितीतरी गोष्टी मनाच्या रंगपटलावर सहज उतरल्या... माळ्यावर ठेवलेल्या पणत्या, आकाश कंदील🏮, किल्ल्यावर ठेवायची चित्रे🪅🐅🐘 सगळ्या गोष्टीत त्या त्यावेळी अडकलेला आपला जीव...
अलगद लहानपणापासूनची दिवाळी आठवायला लागली. अरे ही पणती किती शोधली होती मी , आठवते मला हत्तीचीच हवी होती त्यावर्षी🐘... बरेच ठिकाणी शोधल्यावर कुंभार आळीच्या त्या कोपऱ्यातल्या दुकानात मिळाली शेवटी तेव्हा कुठे दिल खुश हो गया. अय्या हा आकाशकंदील🏮 तर मी विसरलेच होते. किती जपून जपून ठेवला होता गेले कित्येक वर्ष. आपल्या घराची शोभा कितीदा याने वाढविली. सगळे जण थांबून थांबून विचाराचे कुठून आणला हा दिवा, कुठे मिळाला वगैरे वगैरे....
या सगळ्यात एक गोष्ट नक्की. फराळ🥟.... सगळ्या घरच्यांनी एकत्र बसून केलेला फराळ. सगळ्यांनी केलेली तारीफ ऐकून आईचा चेहरा आनंदाने भरून जायचा. फराळ करतानाचे तिचे कष्ट सार्थकी लागायचे. पूर्वी सगळे पदार्थ घरीच केले जायचे. घरातील सर्व जणी मिळून ते करायच्या. त्याची चव निराळी असायची. प्रत्येकीने प्रेमाने केलेले पदार्थ जिभेवर रेंगाळत रहायचे. वर्षातून एकदा होणारी खरेदी.👕👚 आवर्जून दिवाळीत केली जायची. आवडीचे कपडे मिळायचे. आता पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी खरेदी आपण करतो पण खर सांगा दिवाळीत एकदा मिळणारे कपडे आणि आता पाहिजे तेव्हा केलेली खरेदी काय जास्त आवडीचे?
दर वर्षी येणारा हा सण. सगळे जण आवर्जून साजरा करतात. भलेही काळानुरूप गोष्टी बदलल्या आहेत. पण हा एक सण सगळ्यांना जवळ आणणारा. वेळात वेळ काढून फॅमिली गेट टू गेदर,👫🧑🤝🧑👭 मित्र परिवार भेटीगाठी करण्याचा. पण काळानुरूप मनाची साफसफाई ही केली जायला हवी.... हो ना...
आता शहरात आवर्जून एक दिवस नातेवाईकांचे गेट टू गेदर असते तसे मित्र परिवाराचे असते. काळानुरूप गोष्टी बदलल्या. कामामुळे भेटी गाठी कमी झाल्या. पण दिवाळी हा सण असा आहे की आवर्जून गोष्टी अजूनही केल्या जातात भलेही फराळ चितळ्यांच्या असो पण त्यावर ताव मारायला सगळे भेटतातच. मग आठवली का तुमची आठवणीतली दिवाळी😀
©kkdhanashree

Comments
Post a Comment