पानशेत धरण फुटले...

 दोन दिवस आधीपासून पुढच्या संकटाची माहिती आकाशवाणी, वृत्तपत्रातून दिली जात होती. परंतु, कोणत्याच पुणेकराला संकटाचे गांभीर्य लक्षात आले नव्हते. ती सकाळ होती, १२ जुलै१९६१  या दिवशीची. पुणे आणि पुणेकर यांचा नित्यक्रम सुरू झालेला होता..... आणि अचानक बातमी आली पानशेत धरण फुटले.. क्षणभर कोणालाच काहीच सुचेना ....

त्यावेळेस आम्ही फुटक्या बुरुजपाशी राहत होतो. नात्यात शुभकार्य असल्यामुळे मी २-३ दिवस आत्याकडे राहायला सदाशिव पेठेत गेलो होतो. आई आणि बहीण ११ जुलैला घरी गेल्या होत्या. १२ जुलै चा दिवस उजाडला तो संकटाची नांदी घेऊनच. आदल्या दिवशी वडील परगावी गेले होते. ही बातमी पुण्यात सर्वत्र पटकन पसरली. बातमी कळताच काकांना परिस्थितीची कल्पना आली आणि ते धावतच शनिवार वाड्याकडे निघाले. एव्हाना पाणी पसरायला सुरूवात झाली होती. 

बघता बघता पाणी कंबरेपर्यंत आले होते. काकांनी आई आणि बहिणीची सुटका केले पण शनिवार वाड्यापलीकडे राहणाऱ्या आत्याकडे त्यांना जाता आले नाही कारण पाण्याची पातळी खूप वाढली होती. वडीलांपर्यंत ही बातमी पोहोचायला दुपार झाली. पण त्यांना लगेचच सार्वजनिक वाहतुकीचे कोणतेच साधन न मिळाल्या मुळे त्यांना लवकर पोहोचता आले नाही. नारायण पेठ, शनिवार पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ पाण्याखाली गेल्या होत्या. प्रत्येकजण जमेल तसे आपले सामान एकवटून आपला जीव वाचवायला धडपडत होते. 

पुरामुळे झालेली हनी खूप मोठ्याप्रमाणात होती. बऱ्याच लोकांची घरे पुरात वाहून गेली होती. कित्येकांचे संसार कोलमडून पडले होते. 

झालेली हानी प्रचंड होतीच त्यात पाणी आणि वीज यांची नंतर आबाळ होती. कुठे जावे काय करावे कोणालाच समजत नव्हते. सगळे लोकं सुन्न झाले होते.

या गोष्टीला ६० वर्षे आजमितीला पूर्ण झाली आहेत पण आपण बदललो नाही. निसर्ग विरुद्ध जाऊन आपण आपल्या वाढलेल्या गरजा सोयी पूर्ण करण्याचा अट्टाहास करीतच आहोत 

आता यावर  म्हणावेसे वाटते की,

बातमी आली, धरण फुटेल अशी,

पण त्याची गंभीरता कोणीच नाही घेतली,

१२जुलै चा सूर्योदय संकट घेऊनच आला, 

धरण फुटले, नदीला पूर आला,

आलेल्या पुराने कित्येकांचे सर्वस्व लुटून नेले,

बऱ्याच जणांचे संसार उघड्यावर पडले, 

वेळोवेळी निसर्ग सांगायचं आलाय,

माझ्या विरुद्ध जाऊ नका, जाऊ नका,

६० वर्षा पूर्वीची ही कहाणी

आताही आपली ती रडगाणी,

कधी शिकणार यातून, कधी पुढे जाणार,

निसर्ग मात्र आपल्याला शिकवत राहणार, शिकवत राहणार

( ही सत्यकथा आहे. माझ्या वडिलांनी अनुभवलेली) 


©kkdhanashree


Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद