माझे शिक्षक

 शिक्षक आपल्या जीवनातील अविभाज्य घटक. शाळा हा आपल्या जीवनातील महत्वाचा अध्याय जो आपल्याला जन्मभर पुरतो आणि आवश्यक असतो. आईवडिलांना नंतर महत्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक. मुलं शाळेत आली की त्यांच्यासाठी आदर्श असतात शिक्षक. माझ्या आयुष्यात माझ्या काही शिक्षकांचे आदराचे स्थान कायम स्वरुपी आहे. माझे आईबाबा, श्रीकृष्ण जोशी सर, कोठावदे सर,वृषाली ताई. आपल्याला या शिक्षकांची आठवण फक्त शिक्षक दिनाला व्हावी असे नक्कीच नाही. खरेतर शिक्षकांनी शिकवले पुस्तकी ज्ञान हे आपल्याला उपयोगी असते पण त्या बरोबर उदाहरणे देऊन किंवा लहान मोठ्या प्रसंगातून दिलेले ज्ञान हे आयुष्यभर उपयोगी पडणारे असते. शिक्षक मुलांमध्ये कधी दूजाभाव करत नाही. पण ज्या शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांतील अचूक गुण टिपता येतील तो शिक्षक हा उत्तम शिक्षक होईल असे मला वाटते. बालवाडी पासून शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण माझे एकाच गावात झाले. तेथील माझे शिक्षक खूप आदरणीय आणि उत्तमच आहेत. पुढे ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाच्या निमित्ताने मी पुण्यात आले. भिकुले सर आणि गव्हाणे सरांशी ओळख झाली. एखाद्याने एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेणे काय असते हे मी या दोन्ही सरांकडून शिकले. आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे मी पदवी घेतली त्यानंतर माझे पदव्युत्तर शिक्षण माझ्या गावी झाले. लग्नानंतर मी पुण्यात आले. सेट परीक्षा पास व्हावी या उद्देशाने मी एक लहान कोर्स केला आणि नंतर मी सेट परीक्षा पास झाले. या दरम्यान लहान मुलांना शिकवावे म्हणून मी  सहा महिन्यांचा बालवाडी चे प्रशिक्षण घेतले. तिथे माझी भेट झाली वृषाली ताईंशी. त्या जितक्या तळमळीने शिकवतात ते बघून एक शिक्षक त्या किती प्रयत्नपूर्वक घडवतात हे समजते. आपल्या पेहरावापासून ते वागणे बोलणे सगळेच त्यांनी खूप उत्तमच शिकवले.  मी शिक्षिका झाले. सगळ्याच गोष्टी छान घडल्या. मुलांमध्ये रममाण होऊन त्यांच्या सोबत खेळणे, गाणी गाणे, शिक्षण देणे घेणे, घेणे या अर्थाने की मुलं पण आपल्याला काही ना काही शिकवत असतात. माझा पहिल्या बॅचचा विद्यार्थी, मी शाळेत लागून पंधराच दिवस झाले होते एक दिवस अचानक घरी जायचे म्हणून रिक्षेवाले काका आले तर निघाला एकदम काय वाटले त्याला माहीत नाही माझ्याकडे आला आणि मला मिठी मारून म्हणाला" ताई! मला घरी जायचे नाही मला तुमची खूप आठवण येते". ते बालमन पाहून मलाही गहिवरून आले. बास! क्षणभर मला वाटले की अरे या मुलांनी मला किती पटकन आपलेसे केले. एका मुलीने मी एकदा सांगितलेली गोष्ट परत तशीच म्हणून दाखवलेली पाहून मला आनंद झाला.  मुलं आपल्या आईवडिलांना काही गोष्टी नाही सांगणार पण ताईंना सगळे सांगायचे असते. काही काळापुरते ताई त्यांचे विश्व असतात. अगदी ताई असे गाणे म्हणतात, ताईंनी आज ही गोष्ट सांगितली,असे बरेच अनुभव येतच असतात. अगदी सध्या मी ज्यांच्याकडे भगवत गीता शिकते आहे त्या माझ्या शिक्षका गद्रे काकू या तर उत्तमोत्तम शिक्षिका आहेत. अतिशय शांतपणे समजून सांगून त्या प्रत्येक श्लोक आम्हाला शिकवतात. माझे आजोबा गुरुवर्य गो. ना. वाघ सर हे एक उत्तम शिक्षक होते. त्यांनी अगणित विद्यार्थी घडवले. अशा माझ्या महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त आजोबांकडून आलेला वारसा पुढे मी, माझ्या भावाने सुरू ठेवला आहे. कुठेलच क्षेत्र सोपे नसते तसे हे ही नाही. पण आपण जर ठरवले तर हे शिक्षण क्षेत्र उत्तम घडावण्याचे सामर्थ्य ठेवू शकतो. माझ्या सर्व शिक्षकांना माझा मनापासून नमस्कार🙏😊

     हे सर्व माझे शिक्षक आहेत-: कराळे बाई, मानमोडे सर, अनुराधा मावशी, जोशी मॅडम, इसावे    मॅडम, वंजारी सर, पाचर्णे सर, चाबुकस्वार मॅडम, जाधव सर, करंजुले सर, देशमुख सर, दैठणकर सर, खरमाटे सर, पाटील सर, कोरडे सर, नायडू मॅडम, पटेल मॅडम, कुसळे मॅडम, मुळे सर ,जोशी सर, सोमण मॅडम,सोमण सर, भणगे सर, अरणकल्ये मॅडम व सर, वैद्य मॅडम, पुंडे मॅडम, गोखले सर , मॅडम, करंदीकर सर, मॅडम, तांबोळी सर, सारडा सर, वाठोडकार मॅडम, मुळे मॅडम, पोटे सर, कुबेर मॅडम, व्ही. डी कुलकर्णी सर, धर्माधिकारी सर, आहेर सर, जोशी सर, जी.ए. कुलकर्णी सर, दैठणकर मॅडम, गायकवाड सर, पाठक सर, कोठावदे सर, दलाल सर, ठोंबरे सर, मिसाळ सर, पाटील सर, पवार सर, भिकुले सर, गव्हाणे सर, सेनगुप्ता मॅडम, साखरे सर, मीनल ओक मॅडम, शेलार मॅडम, मते सर, जोशी सर, लेले सर, सारिका ताई, वृषाली लेले ताई, राजश्री ताई आणि गद्रे काकू या सर्वांना आणि असे अजुन बरेच शिक्षक ज्यांची नावे यात लिहायची राहिली आहेत त्या व या सर्वांना माझा नमस्कार😊🙏)



©kkdhanashree

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद