साडी जीवाभावाची मैत्रीण


साडी नावातच सर्वकाही सामावलेले, साडी म्हंटले की विविध प्रकारच्या साड्या डोळ्यासमोर येऊ लागतात. जरीकठी, फॅन्सी, रोजच्या नेसायची वगैरे वगैरे. तर साडी लहान मुलींपासून ते आजीपर्यंत सगळ्यांनाच आवडणार पेहराव. तुम्हाला हवा ती आणि हवा तशी नेसा. साडी नेसणे ही पण एक कलाच आहे. साडी सगळ्याच जणी नेसतात पण साडी व्यवस्थित नेसणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. साडी भरपूर प्रकारे नेसता येते. सणवार असो, मंगलकार्य असो किंवा काही असो मला तर सगळ्यात जास्त आवडणारा हा पेहराव. काही जणींना 'आईग! साडी' असे होते पण मला 'अहाहा साडी, व्वा!' साडी असे होते. साडीवर आत्ता पर्यंत गाणीही रचली गेली आहेत. साडी मग ती सहावारी असो किंवा नऊवारी बायकांना खुलवतेच. साडीतील सौंदर्य म्हणजे अहाहा काय सांगू. पैठणी, कांजीवरम,शालू, नारायण पेठी, गढवाल, क्रेप, शिफॉन, सिंथेटिक, सूती अशा बऱ्याच प्रकारच्या साड्या नेसल्या जातात. लग्नात तर नवी नवरीचे लावण्य साडीतच खुलून येते. जसे साड्यांचे प्रकार महत्वाचे तसेच महत्वाचे रंगही. "या रंगला या रंगाची किनार नाही का?" "हा रंग जरा गडद हवा." "अरे काय रंग आहे ,व्वा सुरेख!"असे नेहमीच ऐकायला येणारे संवाद. मला तर साड्यांची महाराणी पैठणी खूप आवडते. माझ्या लग्नात माझा शालू घ्यायला आम्ही ५ जण गेलो होतो पण अक्षरशः १० मी माझा शालू निवडून झाला होता. अर्थात साडी विकणाऱ्यालाही समोरच्या स्त्रीला कोणती साडी खुलून दिसेल हे आपल्या पेक्षा जास्त छान माहीत असते. साडी पुराण कधीच न संपणारे आहे. अशी ही साडी प्रत्येक स्री ची जीवाभावाची मैत्रीण. सगळ्या सख्यांना हवी हवीशी वाटणारी साडी!

साडी खुलावते सौंदर्य माझे,
साडी जणू सर्वस्वच सारे,
खुलवते  साडी लावण्याची खाण,
साडी प्रत्येक स्त्रीचा अभिमान
साडी विषय छान
कधीही न संपणारे पुराण


©kkdhanashree

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद