माझे स्वयंपाक घर

 

नावातच सगळे काही लपले आहे. पण हे फक्त माझे आहे का, तर याचे उत्तर नाही असे असणार. पूर्वी पासून हे स्वयंपाक घर कोणा ना कोणाचे आहे आज्जे सासू, माझ्या सासूबाई, चुलत सासू बाई, माझी नणंद अशा सगळ्याच जणी इथे वावराल्या. आता माझ्या लग्नानंतर मी इथे असते. इथे अथ पासून इति पर्यंत आता सगळे मी माझ्या सोयीने ठेवलेले, बदल केलेले आहेत. तसेच मी वापरते आहे. अगदी २५ माणसांच्या स्वयंपाकापासून इथे रोजचा ५ जणांचा स्वयंपाक मी रोज इथे करते. आधुनिक काळाप्रमाणे यात बरेच बदल झाले आहेत आणि ते साहजिकच आहे. माझी सकाळ स्वयंपाक घरात प्रवेश करून चहा, लेकाचे दूध इथून सुरू होते. असे नाही की दिवसभर तिथेच असते पण दिवसातला काही वेळ तरी माझा इथेच जातोच. रोजचा स्वयंपाक असो अथवा सणवार, येणारे जाणारे असो माझे स्वयंपाक घर सगळे करायला सज्ज असते. प्रत्येक गृहिणींचा अधिकार ,कर्तव्य म्हणजे स्वयंपाकघर. माझ्या लग्नाआधी माझ्या माहेरच्या स्वयंपाक घरात माझा वावर असायचा. नवीन पदार्थ करणे, आईला थोडी फार मदत करणे असे काही. पण आता हे स्वयंपाक घर माझे आणि मी त्याचीच झाले आहे. खरे तर माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासूबाई सगळे करीत होत्या. पण कालांतराने त्यांच्या तब्येतीमुळे मी सगळे करायला लागले आणि या स्वयंपाक घराशी एकरूप झाले. माझी चिडचिड, माझे विचार माझा आनंद सगळे काही इथे असते. पण जेव्हा मला हे समजले की आपल्या मनातले भाव जेवणात उतरतात तेव्हा पासून मी कितीही चिडले तरी स्वतः ला शांत करूनच मगच स्वयंपाक करते आणि ज्या दिवशी मी चिडते त्यादिवशी माझा स्वयंपाक खरचं खूप चविष्ट होतो. कोरोनामुळे माझ्यातील पाककला जास्त उत्तम झाली.  असे हे माझे स्वयंपाक घर इथे मला आरोग्य जपणे हेही समजले. आपल्या घराचे आरोग्य हे आपल्याच हातात असते आणि या स्वयंपाक घरात असते हे मला इथेच समजले आणि मी ते मी उपयोगात आणायला सुरूवात केली. पदार्थ चविष्ट होण्यासाठी आपले मन स्वच्छ ,निर्मळ आणि आनंदी असले की अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद देते हे नक्की🙏
अशा या माझ्या स्वयंपाकघरातून सर्वांना यथासांग सर्व काही मिळावे. अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त सतत माझ्यावर आणि माझ्या स्वयंपाकघरात राहो हीच इच्छा😊

मला माझ्या स्वयंपाकघरात सुचलेली एक
कविता
सकाळ पासून रात्री पर्यंत कामात असते हे,
माझ्या बरोबरीने सतत बिझी असते ते,
काय करावे, काय बनवावे ठरवणे इथेच,
माझ्या मनातले विचार व्यक्त होतात तिथे,
गरम-गार, गोड-तिखट सगळेच जमवणे असते
स्वयंपाकघर  प्रत्येक स्त्रीच्या जवळचेच असते
तेल, मोहरी, हिंग ,हळद यांची सुरू असते लढाई,
हुळच करावी लागते त्यांची रवानगी कढईत,
सणवारला गडबड असते तिथे,
शांत झाले सगळे की सुख वाटते इथे,
स्वयंपाक छान जमला की हसते हे
जाणवते मला सतत पाठीच उभेच हे
उदरभरण सांभाळणे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य,
स्वयंपाक घराच्या मदतीने ती सांभाळते सगळ्यांचे आरोग्य,
स्वयंपाक घर जिथे जीवन कसे,
सतत आनंदी ते राहावे हेच एक मागणे
हेच एक मागणे

©kkdhanashree

Comments

  1. आपलंसं आणि प्रत्येकाला स्वतहा लिहील्या सारखं वाटतं वाचताना simply nice 👌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर , स्वयंपाकघरच किचन झालं तरी भावना त्याच आणि तशाच आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद