आमची दक्षिण भारताची सहल

 या गोष्टी ला आज बरोबर १९ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना दिलेला उजाळा.


मोठ्या मामाचा फोन आला. दक्षिण भारताची सहल ठरवतो आहोत तुम्ही येता का? आईबाबांना काही कारणाने शक्य झाले नाही पण मी आणि माझा भाऊ असे दोघे येऊ. हे नक्की झाले. असंख्य प्रश्न मनात होते. पहिल्यांदा इतक्या लांब जाणार. कसे असेल तिथले वातावरण? किती वेळ लागेल? नुसती इडली आणि भाताच खायचा का? चुकून कर चुकलो तर काय? आणि असे बरेच. १८मे २००२ नागपूरहून सकाळची गाडी होती नागपूर ते चैन्नई. आम्ही सगळे मिळून १६ जण होतो. फक्त एक मामा, एक भाऊ आणि माझे आईबाबा एवढे सोडून आम्ही सगळे होतो. आजीपासून(वय वर्ष ६७/६८) ते लहान बहिणी (वय वर्ष६) पर्यंत. नागपूरहून निघालेली गाडी आंध्रप्रदेशातून पुढे दक्षिणेकडे जाणारी. सगळे बरोबर, त्यामुळे मज्जाच मज्जा. जेवणाचा डबा सोबत घेतलेला. दिवसभर गाडीत फिरणेच सुरू होते. कधी या डब्यात तर कधी दुसऱ्या. माझ्या माहेरी रेल्वे नसल्यामुळे मला रेल्वेचा फारसा अनुभव नाही. त्यामुळेही मनात जरा धाकधूक होतीच. हळूहळू मजल दर मजल करत गाडी पुढे जात होती. जेव्हा गाडी आंध्र प्रदेश मध्ये आली तेव्हा गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र तिथे मी पहिल्यांदाच पाहिले. अथांग, विस्तीर्ण, खूप मोठे काय म्हणून अजुन मी ते पाहताच राहिले. राजमुद्रीचा तो ब्रीज कधी संपूच नये असे वाटत होते. ४ किलोमीटर पेक्षा जास्त मोठा असा तो ब्रीज पुढे पुढे जात राहतो. त्याबरोबर गोदावरी माईचे डोळ्याचे पारणे फेडणारे रूप काय सांगावे तिचे वर्णन. अहाहा सुंदर, अथांग. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही चेन्नईला पोहोचलो. मग जवळचे एक लॉज शोधून तिथे जाऊन सगळं आवरून तिथे एका हॉटेल मध्ये न्याहारी अर्थातच इडली सांबार खाल्ले. तिथून आम्ही एक १७ सिटर गाडी केले आणि चेन्नई फिरायला निघालो. आधी आम्ही गोल्डन बिच ला गेलो. तिथे खूप सुंदर सुंदर देखावे आम्हाला पाहायला मिळाले. तिथे बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग होते असे समजेल. तिथे एका ठिकाणी एक माणूस अर्थातच जिवंत उभा होता आणि शेजारी पाटी होती. हा कधीच जागचा हलत नाही. आम्ही सगळे काहीना काही शक्कल लढवून त्याला हलवू पाहत होतो पण तो काही हलतच नव्हता. शेवटी माझा एक मामा त्याच्या समोर जाऊन न हलता त्याच्याकडे टक लावून पाहू लागला. २ मिं झाले,५ झाले,१० झाले तो दोघेही हलेना. पण शेवटी तो माणूसच हलला. आणि मामा कडे पाहून हसला. ते पाहून आम्ही सगळ्यांनी जोरजोरात हसायला सुरूवात केली. तिथून पुढे आम्ही कांचीपुरमचे मंदिर पाहायला गेलो. येता येता आम्हाला राजीव गांधींची जिथे हत्या केली गेली ते ठिकाण बाहेरूनच पाहायला मिळाले. मग आमचा चेन्नईचा परतीचा प्रवास सुरू झाला. परत आल्यावर आम्ही आमचे सामान घेऊन स्टेशन गाठले तिथे पोहोचायला ८ वाजले होते आणि आमची ९ ची गाडी होती. पण तिथे स्टेशन वर आम्हाला भेटायला माझी धाकटी आत्या आणि आत्ये बहीण येणार होत्या

आम्ही तिथे पोहोचलो आणि तेवढ्यात त्या आल्याचं. आत्याला पाहून मला मनस्वी खूप आनंद झाला. ही माझी आत्या आमच्या घरा समोरच्या घरी राहायची. काही कारणाने काका, आत्या आणि बहीण चैन्नईला आले होते. आणि या परक्या ठिकाणी रोजच्या माणसाला पाहून किती आनंद वाटेल तसेच माझे झाले होते. त्यांना भेटून आम्ही पुढची गाडी पकडून आम्ही मदुराई ला निघालो.
क्रमशः

Comments

  1. आपल्या या लेखांमधून प्रत्यक्षात दक्षिण भारत ची सहल अनुभवण्याचा आनंद होत आहे

    ReplyDelete
  2. वा वा फारच सुंदर अनुभव आणि रोमांचक सुद्धा !!

    ReplyDelete
  3. Khupach chhan lihile ahe dhanashree.
    Mi tar baryach goshthi visarlo hoto,
    Almost sagala athvayala lagal,tuzya hya lekhana mule,
    Tya stachu pudhe mi javalpas 15 minutes ubha hoto.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद