पत्रलेखन

 मागच्या वर्षी ऑक्टोबर२०२० मध्ये मुलाच्या शाळेत पालकांसाठी काही ऑनलाईन स्पर्धा झाल्या. नृत्य, चित्रकला आणि पत्रलेखन. यातील पत्रलेखन स्पर्धेत मी सहभागी झाले होते. माझ्या पत्रास द्वितीय क्रमांक मिळाला. ते पत्र पुढीलप्रमाणे

 

                        ||श्री|| 

                                           ऑक्टोबर २०२०

प्रिय मानवा

                   सप्रेम नमस्कार

कसा आहेस? अशा आहे तुझ्याकडे सर्व कुशल असावे. बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलायचे होते. या जीव सृष्टीनिर्मिती मध्ये मी तुझी (सर्वोच्च) निर्मिती केली. तू पण माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आला आहेस किंवा करतोच आहेस. अरे पण तुझ्या विज्ञानातील प्रगतीमुळे तू मला कुठे ना कुठे सतत दुखावतो आहेस. मी कधी कोणाला कृपाळू तर कोणाला क्रूर वाटतो आहे. तुझ्या म्हणण्यानुसार मी लहरी बनतो आहे. पण खरंचच तसे आहे का? पाण्याचा अपव्यय, वृक्षतोड, भूगर्भातील तेलाचा सतत उपसा यागोष्टी करून तू मला सतत त्रास देतो आहेस. मी घालून दिलेल्या नियमांच्या विरुद्ध तू जातो आहेस. याचा तू विचार कर. 

  " मानवा, मानवा वेळीच हो तू सावध,

 आनंदी रहा, तू माझा रहास थांबव,

धरणीकंप नको तुला, शांत जीवन हवे,

 जंगलतोड नको मला, थांबव हे सगळे,

 पाण्याला तू जप नीट, वेळीच लक्ष दे,

 मी देत राहीन तुला , जे जे तुला हवे,

लक्षात ठेव मानवा, तू माझी निर्मिती आहेस आणि मी तुझा बाप आहे, हे विसरू नकोस. अधिक काय लिहू तू सुज्ञ आहेस.

थोरांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद 

कळावे,  


 तुझा निर्माता,

निसर्ग


Comments

Popular posts from this blog

कमळगड आणि बरेच काही....

Mind-Blowing

आहुपे मधील गोलमेज परिषद