ठरवलेला घनगड आणि अचानक झालेला तैलबैला
रविवार, त्यात नोव्हेंबर महिना त्यामुळे अर्थातच गडकिल्ले भटकंती ही आलीच. नेहमी प्रमाणेच अचानक ठरवलेला प्लॅन. मग काय चलो घुमने... आम्ही दोघे, आमचा लेक आणि भाचा असे नेहमीचेच मावळे. घनगड लोणावळ्यापासून साधारण 36 किलोमीटरवर आहे. रस्ता कसा आहे? हे माहीत नसल्यामुळे आम्ही लवकर निघालो. लोणावळ्याच्या पुढे कोरीगडकडे जाताना सूर्योदय झाला होता. पण सकाळी सकाळी हा भास्कर जरा लपंडाव खेळण्याच्या मूड मध्ये आहे असे आम्हाला जाणवले. जरा वेळ याचा लपंडाव आम्ही एन्जॉय केला आणि मग कोरीगडहून पुढे आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी निघालो. एक एक ठिकाण मागे सारून आम्ही घनगडाच्या फाट्याला वळलो आणि आमची गडबड झाली. रस्ता जाम बेकार .😱 आम्हाला आमची काळजी तर नवऱ्याला गाडीची काळजी.🤷 कोणाचे काय तर कोणाचे काय... सावकाश! एकदम सावकाश! गूगल मावशीने रस्ता दाखवल्याप्रमाणे आम्ही पायथ्याशी एकोले गावी पोहोचलो. आम्ही लगेचच गड चढायला सुरूवात केली 🏃 थोडे अंतर पार केले आणि एक घनेश्वर चे मंदिर लागले. अर्थात आम्ही सगळे लगेच घरून आणलेल्या पोह्यांची न्याहारी करायच्या तयारीनेच तिथे थांबलो आणि आधी तुटून पडलो. थंडीमु...