सह्याद्रीचे धुरंधर
त्याने विडा उचलला आणि स्वराज्यावर चाल करून आला. त्याने दिसतील ती गावे बेचिराख केली, मंदिरे तोडली, अगणित माणसांची कत्तल केली. पण त्याला माहीत नव्हते की तो एका मृत्यूच्या सापळ्यात अडकत चालला होता. हा सापळा रचला होता शिवाजी महाराजांनी आणि हा सापळा रचण्यासाठी मदत केली सह्याद्रीच्या धुरंधरांनी. योजना तयार होती. त्याला कसा कोणी आडवा करायचा हे ठरले होते. कोणती शस्त्रे वापरायची तेही ठरले होते. काय डाव टाकायचे तेही ठरले होते. फक्त ठरले नव्हते ते म्हणजे ठिकाण. हे ठिकाण ठरवण्यासाठीच महाराजांचे गुप्तहेर चोहूबाजूंना सह्याद्री कड्यांवर फिरत होते. असाच एक प्रबोधिनी गुप्तहेर गट पुण्यनगरी वरून ब्रह्म अरण्याच्या दिशेने निघाला. ही मोहीम खास होती. त्यामुळे या मोहिमेसाठी अश्वही उच्च दर्जाचे मिळाले होते. जे वाऱ्याशी नव्हे गार वाऱ्याशी बोलत होते. पुण्यनगरी जेव्हा गाढ झोपी गेली होती तेव्हाच या गटाने गावाची वेस ओलांडली आणि ब्रह्म अरण्याकडे कूच केले. अख्खा दिवस हा उन्हात जंगलात फिरण्यात जाणार होता. त्यामुळे वाटेतच गटाने न्याहारी करून पुढची वाट धरली. सूर्योदय झा...