सफर कोकणची भाग -२
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व किनारा फिरून आलो म्हणजे जरा लांब जाऊन आलो. बरोबर ७.१५ वाजता आम्ही सावंत यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेलो. श्री व सौ सावंत आधीच तिथे जाऊन थांबले होते. काही वेळात एक काका तिथे आले आणि त्यांनी एक समोरच असलेल्या पिंजऱ्याचे कुलूप उघडून दार उघडले. आम्ही आतुरतेने आता ते काय करणार हे पाहत होतो. त्यांनी एक टब घेतला आणि तिथली एक टोपली उचलून त्यातून वाळू आणि त्यासोबत काहीतरी त्या टबमध्ये घेतले. ते बाहेर आले आणि त्यांनी आमच्या समोर तो टब घेतला आणि आम्ही अक्षरशः पाहत राहिलो. त्या टब मध्ये छोटीछोटी अशी ६ कासवाची पिल्ले होती😍 ती बघून काय प्रतिक्रिया द्यावे हेच समजेना... काकांसोबत आम्ही समुद्राकडे निघालो. आणि आता सुरू झाला कासवांचा खरा जीवन प्रवास... 🐢 लाटेजवळ काकांनी ती पिल्ले वाळूवर ठेवली. एक एक करून ती सगळी पुढे जाऊ लागली. हे सगळं बघताना अंगावर काटा आला होता. माणूस आपल्या बाळाला सर्व काही शिकवतो पण इथे आई २ महिने आधी अंडी घालून निघून जाते त्यांची काळजी हे काका घेतात.... त्यांना पक्षी, कुत्रे सगळ्यांपासून संरक्षण देतात. मग ती अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले ते स...