नवीन जागा नवीन अनुभव, आणि यातून बरेच काही शिकलेलो आम्ही....😊
भटकंती कोणाला आवडत नाही. असे खूपच कमी जण असतील पण आवडणारे अगणित. आम्ही आवडणाऱ्यांमध्ये मोडत असल्याने वेळ, ठिकाण मिळाले की आम्ही फिरून येतो. या वेळेस चे ठिकाण लांब पल्याड होते. स्वच्छ शहर , मोठे रस्ते, हेल्मेट चा नियम कटाक्षाने पाळणारे नागरिक, संस्कृतीचे प्रतीक म्हणून रंगवलेल्या भिंती, प्रत्येक घरा समोरील तुळशी वृंदावनाला बांधलेली ओढणी, प्रत्येक गाडीला बांधलेली ओढणी आणि प्रसन्न वातावरण... हे असे असले की फिरायला पण मजा येते. डे वन पुण्यातून सकाळी साडेद हा वाजता रेल्वेने आम्ही प्रवासाला सुरुवात केली. अख्खा दिवस प्रवास आणि प्रवास... डे टू वेळ संध्याकाळी 4.30 ची. प्लॅटफॉर्म वर गाडीची वाट पाहणारे आम्ही चौघे. अर्थात गाडी किमान एक ते दीड तास लेट. मग काय प्लॅटफॉर्म वर असणारी माणसे त्यांचे निरीक्षण, इंजिन्स, वेगवेगळ्या गाड्या यात वेळ कसा गेला कळले नाही. गाडी आली. थोडा वेळ थांबते करता करता चक्क तासभर तिथेच उभी राहिली. मग काय त्यासाठीही चुळबुळ सुरू झाली. पण एकदाची निघाली आम्हाला घेऊन. ती थेट 2 तास उशिरा आमच्या इच्छित स्थळी पोहोचली म्हणजे रात्री ठीक 2 वाजता 😲तिथू...