Posts

Showing posts from October, 2025

ढाकोबा दुर्ग आणि आईसक्रीम

Image
        आईस्क्रीम हा असा एक पदार्थ आहे की जो दोन प्रकारचा असू शकतो. एक चांगला आणि दुसरा खूप चांगला...... असं कोण म्हणतं?.... असं आसमादिकच म्हणतात. आणि तिखट खाऊन पोटात जाळ झाला असेल तर त्यानंतरचे आईस्क्रीम हे तर आपल्या पोटासाठी आणि जिभेसाठी स्वर्गसुखच. हेच स्वर्गसुख पालक भ्रमंती गटाच्या नवीन मोहिमेच्या सुरुवातीलाच अनुभवले आणि पुढील पूर्ण मोहीम आईस्क्रीम मय होऊन गेली.          तर झाले असे की पालक गट यावेळेस ढाकोबा दुर्ग अशा मोहिमेसाठी निघाला. सकाळी जाता जाता जुन्नरला न्याहारी केली आणि न्याहारीत झणझणीत मिसळ मिळाली. अस्मादिकांचा आणि तिखटाचा ३६ चा आकडा आहे हे बघून देवानेच तेथे आईस्क्रीमही उपलब्ध करून दिले होते. आता देवानेच आईस्क्रीम दिल्यावर नाही तरी कसे म्हणायचे.... लगेच खाऊन घेतले.          न्याहारी करून गट ढाकोबाच्या पायथ्याला म्हणजेच आंबोली गावात पोहोचला. हे आंबोली गाव आपण नेहमी पुस्तकात वाचतो ना अगदी तसेच. तिन्ही बाजूंनी हिरवेगार डोंगर, डोंगरांच्या पायथ्यापाशी वाऱ्यावर डोलणारे शेत आणि तेथेच थोडी कौलारू घरे. असे हे टुम...