Mind-Blowing
" अगं चल ग या वेळी एखादा किल्ला पाहू " "अरे नको रे, पाय दुखतात." " बरं चल मग या वेळी लेण्या पाहू" " नको रे कंटाळा येतो" हे आमचे नवरा बायकोचे संभाषण. अर्थात त्याचे म्हणणे आपण गड किल्ले बघू आणि मी आपली नको रे, पाय दुखतात, कंटाळा येतो. कोणीच नसते, कशाला जायचे.....वगैरे वगैरे... तर तुम्हाला समजलेच असेल..परत एकदा केलेली भटकंती. या वेळेस, आदल्या दिवसापर्यंत जायचे का नाही हा निर्णय घेणे पावसामुळे पुढे पुढे जात होते. पण वरूण राजाची कृपादृष्टी आम्हा पामरांवर पडली आणि आदल्यादिवशी संध्याकाळी उशिरा आम्ही जायचे नक्की केले. सकाळी लवकर निघून आम्ही फक्त न्याहारीसाठी थांबा घेतला आणि तिथून जे सुसाट निघालो ते थेट आगाशिव लेण्यांच्या पायथ्याशीच थांबलो. तर वरचा संवाद अर्थात यासाठी होता. इथे आलो आणि पायऱ्या चढायला सुरुवात करणार तर मोरराजाने 2-4 क्षणांसाठीच दर्शन दिले. ते फक्त डोळ्यांनी टिपण्यासाठीच ( मोबाईल काढून फोटो काढण्यासाठी त्याने वेळ दिलाच नाही) जवळ जवळ 5 फुटा एवढा त्याच्या पिसाऱ्याचा झुपकाच होता. डोळ्याचे पारणे फिटले ना राव!... काय सांगू काय वाटले😯 जब...