Posts

Showing posts from January, 2025

एका मेजवानीची भ्रमंती

       ठरले ठरले ठरले  . . . . .        मेजवानी करायचे ठरले.. कधी? केंव्हा? कुठे?..       सांगतो SS ,  सांगतो SS        बरेच दिवस झाले . . . . . . खरे तर वर्षे झाली .. नाही उलटली . . . . .एक तप  लवकरच होईल. श्री. अमित यांची 'डेला रिसॉर्ट' ची मेजवानी 'pending ' होती. शेवटी नियोजन समितीने एक विशेष बैठक घेतली आणि त्यात मिलिंदने पुढाकार घेऊन पुढच्या रविवारी या मेजवानीचा घाट घातला. जे जे फुकट ते ते पौष्टिक असे कोणीतरी म्हणले आहे त्यामुळे इथे पुढाकार(?) असे कोणीतरी कुजबुजले. यात कोणी म्हणले आहे असे ऐकल्यावर लगेच मिलिंद आणि गणेशने काही पुस्तकातले संदर्भ देऊन हे कोणी म्हणले आहे हे सांगितले. पण बाकीच्या सभासदांनी कोणी का म्हणेना असा सूर लावला त्यामुळे गाडी परत मेजवानी कडे वळली. या वर्षभरात बरेच घाट चढले आणि उतरले. त्याची सांगता आपण या मेजवानीचा घाट घालून करू असा प्रस्ताव नेहमीप्रमाणे मिलिंदने मांडला आणि त्याला साहजिकच सर्व नियोजन समितीने मूक अनुमोदन दिले.         तारीख ठरली, वा...