कोकण आणि समुद्र आणि फक्त कोकण आणि फक्त समुद्र❤️🏝️🏖️🌅
दर वेळेस काय कोकणात जायचे? तोच तो समुद्र काय पाहायचा..... जेव्हा हा डायलॉग मी ऐकला तेव्हा मला वाटले कोकणापेक्षा उत्तम जागा आहे का खरे सुख, खरा आनंद अनुभवायला? जगाच्या पाठीवर कुठेही जा. समुद्र तो समुद्रच राहणार, पण त्याचे सौंदर्य मात्र प्रत्येकाच्या दृष्टीवर अवलंबून असणार हे नक्की. नमस्कार मी धनश्री आणि हा माझा नवीन ब्लॉग. दर सुट्टीत भ्रमंती करायचीच हा ठरलेला अलिखित नियम आहे आमचा. तो या सुट्टीतही आम्ही पाळलाच.🚙⛱️🏝️ मग काय लागली सुट्टी, बॅग भरा आणि निघा. पण एक गंमत, सरळ वाटेने न जाता जरा आडवाटेने निसर्ग अनुभवू, म्हणून या वेळच्या भटकंतीची सुरुवातच केली माणगडने. हा रांगडा गडी रायगडाच्या अगदी जवळ उभा असलेला. आपल्या रायगडाचा उपदुर्गच म्हणा ना त्याला. अतिशय सुंदर असा हा गड दिसताक्षणी नक्की किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही बरं का. जेमतेम पर्वती चढू.. असे वाटते पण...इतकाच वाटलेला हा गड त्याहून थोडा मोठाच आहे ना. पायथ्याशी गाडी लावून आम्ही गड चढून वर गेलो. आमच्या शिवाय गडावर कोणीही नव्हते.वर गेल्यावर देवीचे मंदिर लागले. नुकत्याच आलेल्या आजारपणामुळे मला पुढे चढून जाणे शक्य झा...