Posts

Showing posts from September, 2024

खेळ मांडियेला....

Image
 वरूण देव आणि सूर्यदेव यांचा सोंगट्यांचा डाव चालूच होता. आता देवांचा डाव म्हणल्यावर तो थोडीच लगेच संपणार आहे. दोघेही त्वेषाने खेळत होते. डाव खरंच रंगात आला होता. पण अचानक काही शब्द त्यांच्या कानी पडले, "आम्ही पृथ्वीतलावर जो डाव मांडला आहे, त्यापुढे हा डाव काहीच नाही." वरूण देव आणि सूर्य देवांनी बघितले तर आदिशक्ती जिजाऊ तेथे आल्या होत्या. दोघांनीही जिजाऊंना विचारले, "का बरे, असा कोणता डाव तुम्ही मांडला आहे?" जिजाऊ म्हणाल्या " तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा." दोघांनाही प्रश्न पडला की पृथ्वीतलावर हा डाव तरी कोठे मांडला आहे. जिजाऊ म्हणाल्या, "ते बघा प्रबोधिनीचे काही मावळे त्याच दिशेने जात आहेत. जा त्यांच्याबरोबर आणि बघून या. राजे शिवाजी देखील तिकडेच गेले आहेत." असे म्हणल्यावर वरूण देव आणि सूर्यदेव ढगांच्या मागून लपतछपत या प्रबोधिनी गटाच्या मागे मागे जायला लागले. हा प्रबोधिनी गट करतो तरी काय ते बघायला लागले तेव्हा हा गट कुरवंडे गावात पोह्यांवर ताव मारत होता. दोघांच्याही तोंडाला पाणी सुटले. पण त्यांना जास्त उत्सुकता होती की पुढे काय डाव मांडला आहे.  आता ...