भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
भ्रमंती रसिकहो ही कथा आहे वरूण देवाच्या रुद्रावतराची, मावळ्यांच्या एका सोप्प्या धाडसाची आणि वरूण देवाच्या पाठिंब्याची.... या कथेत नेहमी प्रमाणे प्रबोधिनीचे काही मावळे आहेत. या मावळ्यांनी वरूण देवाकडील नाण्याची एक बाजू लींग्या घाटात बघितली. आता यांना नाण्याची दुसरी बाजू बघायची होती. त्यासाठी नियोजन गटाने प्रचंड मेहनत घेऊन आणि तपश्चर्या करून वरूण देवाची परवानगी घेतली. हे कार्य आषाढ महिन्यातच करण्याचे योजिले. मात्र वरूण देवाने एक अट घातली...... ती अशी की...... सर्वांना ही मोहीम सोप्पी आहे असे सांगायचे.....आणि स्वामींकडून एक मंत्र दिला 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे".... नियोजन समितीला काही बोध होईना...आता देवाजीच्या आले मना....तर नियोजन समितीने ही अट मान्य केली आणि मोहिमेचा श्रीगणेशा केला. मोहिमेत मावळ्यांची संख्या बघता दोन रथ घ्यावे लागले. हे रथ आषाढ कृष्ण अमावस्येला...हो अमावस्येलाच... रणभूमीवर एक सोप्पा पराक्रम गाजवण्यासाठी निघाले. वरूण देवांनी आपल्याकडील नाणे थोडे तिरके करायला सुरुवात केली. हे बघून सूर्य देव ढगांच्या मागे दडी मारून बसले ते दिवसभर बाहेर आलेच नाहीत. त्यामुळे त...