ये तारा वो तारा हर तारा देखो जीसे भी लगे प्यारा...
ये तारा वो तारा हर तारा देखो जीसे भी लगे प्यारा ...⭐⭐ समोरचे काजव्यांचे चमचमणे पाहिले आणि हेच गाणे आठवले... अहो निमित्त होते.. राजमाचीचा ट्रेक आणि ट्रेल.....हो हो ट्रेक कम ट्रेल म्हणा ना... यावेळी जरा पालक संघाने राजमाची आणि काजवे निरीक्षण असे काहीसे ठरवले होते. कोण येणार म्हणून पोल घेताना ४५ चा आकडा होता पण प्रत्यक्षात हा १३ जणांनी पूर्ण केला. काय सांगता अहो खरचं! खूपच मज्जा आली. लोणावळ्यातील फणासराईला आलो. गाड्या पार्क केल्या आणि तिथून निघून आम्ही जवळ जवळ ८-१० किलोमीटर चालत चालत उभेवाडीला पोहोचलो . जाता जाता रस्त्यात करवंदांचा आस्वाद घेत, मनसोक्त गप्पा मारत मारत आम्ही गेलो आणि आजूबाजूचा नजरा निसर्गाचा हो! 🤩बघत बघत गेलो.... जेवण केले आणि काजवे बघायला गेलो तर.... "ये तारा वो तारा हर तारा देखो जीसे भी लगे प्यारा......." हेच गाणे आठवले... डोळ्याचे पारणे फेडणारे ते क्षण...सर्वत्र निरव शांतता आणि त्यात समोरच्या झाडाकडे टक लावून काजवे पाहणारे आम्ही... अहाहा! टीमटीम टीमटीम चमकणारे काजवे. एक भन्नाट अनुभव आहे बरं का हा!... एकदा तरी सगळ्यांनी घ्यावाच असा... रात्री साधारण तासभर भरप...