आपण हे बघितले का?
स्वतःची कामे सोडून सर्वांसाठी एक भटकंती आयोजित करणे हे तुम्ही कुठे बघितले आहे का? हो, अंधारबन ट्रेक मध्ये. अनोळखी भागात फिरण्यासाठी ओळखीच्यांची मदत घेऊन एक डोंगर यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करणे हे कुठे बघितले आहे का? हो अंधारबन ट्रेक मध्ये. आयत्या वेळेस काय सांगता, आता नाही जमणार. त्यापेक्षा तुम्हाला घेऊन आम्ही पुढे जातो असे कुठे बघितले आहे का? हो, अंधारबन ट्रेक मध्ये. बोंबलत फिरण्याचा मक्ता काय फक्त पुरुषांकडे आहे का, स्त्रिया ही काही कमी नाही असे कुठे बघितले आहे का? हो, अंधारबन ट्रेक मध्ये. भ्रमंतीची सुरुवात अनोळखी म्हणून आणि भ्रमंतीच्या शेवटी अगदी बऱ्याच दिवसांपासून ओळख आहे असे वागणे हे कुठे बघितले आहे का? हो, अंधारबन ट्रेक मध्ये. एरवी त्या कॉम्प्युटर समोर बसून डोळे फाडणारा पण विचारले तर वाटाड्या म्हणून १६ किलोमीटर सहज चालणारा असा वाटाड्या बघितला आहे का? हो, अंधारबन ट्रेक मध्ये. पुण्यात हिवाळ्यात भ्रमंती आणि ती पण एसी बस मध्ये हे कुठे बघितले आहे का? हो, अंधारबन ट्रेक मध्ये. आपल्या सह्याद्री मित्राला भेटण्यासाठी पावसाळाच पाहिजे, हिवाळ्यात काय जायचे असे न बोलता हिवाळ्यातही त्या म...