जय सोमनाथ! 🙏 जय गिरनारी! 🙏
काय सांगता! दहा हजार पायऱ्या😱 बापरे!🙆 माझ्या तर विचारांच्या पलीकडे आहेत आणि... आणि काय सिंह परिवाराचे दर्शन 😲 हे तर अजिबात शक्य नाहीये. अहो थांबा! थांबा! खरं तेच सांगते आहे. जे आहे तेच. तर निमित्त होते यावर्षी दिवाळीतली छोटीशी पण जरा लांबची अशी सहल गुजरातची . थोडा विचार केला, गुजरात मध्ये काय काय बघण्यासारखे आहे. साधारण एका बाजूला येणारे किती ठिकाणं आपण पाहू शकतो. मग लक्षात आलं सोमनाथ, गिर आणि गिरनार हे तिन्ही कव्हर होऊ शकतात. मग काय ठरलं. मित्रांना सांगितल. दोन कुटुंब आम्हाला जॉईन झाले. कुठे, कधी, कसं हे सगळे ठरलं. बुकिंग झालं आणि निघालो. सुरुवात सोमनाथाच्या दर्शनाने केली. मन शांत, प्रसन्न करणारी मोठी पिंड आहे. एकदम सुरेख. नवीन सोमनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन तर घेतलं, पण त्याचबरोबर जुन्या अहिल्यादेवी होळकरांनी स्थापन केलेल्या सोमनाथचेही दर्शन घेतले. बाजूलाच अथांग सागर आहे जो डोळ्यात जेवढा साठवता येईल तेवढा साठवून घेतला. आजूबाजूला छोटी छोटी बरीच ठिकाणं भेट देण्यासारखी आहेत. त्यांनाही जरा भेट दिलीच पण त्यातल्या त्यात लक्षात राहिलेली त्रिवेणी संगम आणि भालका तीर्थ. कृष्...