Posts

Showing posts from May, 2023

आणि योग जुळून आला....😊

Image
  एखादी गोष्ट जर अनपेक्षितरित्या मिळाली तर😀...  दिवस पहिला -  योग जुळून आला की सगळं काही छान पार पडते तसेच काहीसे आमचे झाले. कानडे, जुवेकर आणि जोशी या तीन परिवारांचा सुट्टीला जायचा योग आला. सगळे एकत्रित करायचे ठरले आणि ठिकाण ठरले गणपतीपुळे, रत्नागिरी आणि परिसर. बरोबर काय काय घ्यायचे, रूम्सचे बुकिंग, कशानंतर काय पहायचे? पासून ते वगैरे वगैरे पर्यंत सगळे काही ठरले आणि जमून आले. तो अब बस्स निकल पडो! म्हणत आम्ही ६ मेचा मुहूर्त गाठला....  वेळ संध्याकाळी ४ वाजताची. ठिकाण गणपतीपुळे. MTDC ची उत्तम व्यवस्था अजुन काय हवे सुट्टीचा आनंद घ्यायला ......  भल्या पहाटे म्हणजे ५.३० ला घर सोडले ५.४५ ला पुणे सोडले. यावेळी जरा वेगळ्या वाटेने म्हणून कऱ्हाडमार्गे जाऊ ठरले. रस्ता तसा चांगला आहे पण निघायला जरा उशीर झाल्यामुळे जाम ट्रॅफिक लागले. निघताना कानडे आणि जोशी एकत्र निघाले जुवेकर नंतर येणार असे ठरले. पहिला थांबा विरंगुळा हॉटेलमध्ये घायचे ठरले. अर्थात सुट्टीमुळे तिथे खूप गर्दी होती. मुलांना सँडविच हवे होते पण डोसा खाऊन समाधान मानावे लागले. मिसळ तर प्रचंड तिखट होती....😲आमचा चह...