शिवजयंती जलदुर्गावर साजरी!
यावर्षी शिवजयंतीला एका जलदुर्गावर जाण्याचा योग आला किंवा असे म्हणता येईल शिवजयंतीच्या दिवशी जलदुर्ग भेट. शिवजयंतीला गिरिदुर्ग बघणे बऱ्याच जणांचे हमखास होते पण जलदुर्ग बघणे क्वचित होते. ७ जलदुर्ग महाराष्ट्रात आहेत त्यापैकी शिवाजी महाराजांनी ५ जलदुर्ग बांधलेले आहेत. त्यापैकी एक पद्मदुर्ग . जंजिरा जेव्हा पाहिला होता तेव्हा पद्मदुर्ग शेजारीच आहे हे माहीत नव्हते. (अर्थात त्याबाबत ज्ञान जरा कमीच आहे😉) यावेळी राजेश दादांचा मेसेज आला यावेळेस पद्मदुर्ग च्या ट्रेकचे आयोजन केले आहे. लगेचच जाणे नक्की केले. गिरीदुर्ग फिरणे होते त्यामुळे काठिण्य पातळीची जरा कल्पना होती.पण पद्मदुर्ग बाबत फारसे माहीत नव्हते. जंजिऱ्याला बोटीने जायचे माहीत होते त्यामुळे पद्मदुर्ग ला बोटीने जायचे एवढेच (अपूर्ण) ज्ञान होते. पण किती वेळ लागतो, कोणत्या वेळी जायचे (भरती - ओहोटी) वगैरे प्रश्न होतेच. पण उत्तम नियोजन करून राजेश दादांसोबत आम्ही १६ मावळे जलदुर्ग सफारीला शनिवारी रात्रीच निघालो. मग काय रोह्याला मुक्काम करून प्रभातवेळी आगे कूच केली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात स्वादिष्ट न्याहरीचा आस्वाद घेऊन आम्ही किनाऱ...