खाण्यासाठी जन्म आपुला.....
जगायचे म्हंटले की खाणे आलेच... खाणे हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे😋. प्रत्येकाला कोणता ना कोणता पदार्थ आवडतच असतो. मग तो पुरणपोळी पासून पाणीपुरी पर्यंत तर तूपसाखर पोळी पासून ते पास्त्यापर्यंत आणि थालपीठापासून ते पिझ्झापर्यंत. माझा हा जेवण बनवण्याचा प्रवास माझ्या दृष्टीने भन्नाट आहे...😉. पाहिले पासून मी जेवण बनवण्यासाठी फारशी काही उत्सुक नव्हते. पण तरीही मी केलेला प्रामाणिक प्रयत्न आणि त्यातून झालेली माझी फजिती, गंमत हे मी पुढे सांगते आहे... श्री गणेश अमृततुल्य पासून☕ मी ६ वीत असताना माझ्या बाबांनी मला चहा बनवायला शिकवला आणि मी रोज चहा बनवायला सुरुवात केली. पण काही दिवसातच बाबांनी चहा ,कॉफी घेणे बंद केले (अर्थात त्याला कारण वेगळे होते) 🙈 तर अशी माझी स्वयंपाक घराशी ओळख झाली. एक भन्नाट रेसिपी ( जी कोणाला जमेल का?🤣) पुढे ८ वी मध्ये असताना आई घरात नाही म्हणजे मोकळे रान मग काय नवीन काही तरी बनवू म्हणून बटाटा पोहे भजी 🤭( बटाटा च्या दोन स्लाइस मध्ये पोहे भरून मला त्याची भजी तळायची होती.) आता आठवले की हसू येते😂. तर हा माझा प्रयोग अर्थातच फसला....