Posts

Showing posts from August, 2022

मढेघाट धबधबा- निसर्गाची किमया

Image
 पावसाळा म्हंटले की एक तर गडकिल्ले भटकंती नाहीतर धबधबा भेट हे नक्की ठरलेले.. कात्रज बोगदया आधी आम्हाला नभ उतरू आले असे फक्त शब्दात न म्हणता ते प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे काय हे जाणवले. पुढे नसरापूर फाट्याला वळून आम्ही वेल्ह्याला जायला निघालो. तसा भोर तालुका निसर्गाचे वरदान लाभलेला गड किल्ले असलेला आणि भात शेतीसाठी प्रचलित. याचा अनुभव आपण सतत घेत असतो असो... आम्ही पुढे पुढे जात होतो.  सकाळच्या शांत वातावरणात आम्ही वेल्ह्याला कधी येऊन पोहोचलो कळलेच नाही. इथून पुढे साधारण १७ कि. मी वर मढेघाट धबधबा आहे. रस्ता फारसा चांगला नाही असेच म्हणणे योग्य. गुंजवणे धरणाची भिंत आणि त्या मागे असणारे बॅकवॉटर अहाहा! पावसाळा जोरदार आहे हे यावेळी जाणवले. पुढे पुढे जाताना असंख्य छोटे मोठे धबधबे पाहत होतो.     खरचं निसर्गाचा वरदहस्त लाभलेली अशी ही आमची पुण्यभूमी 😊 पुण्याच्या आजूबाजूला किती तरी छान छान ठिकाणे बघण्यासारखी आहेत. सर्वत्र धुकेच धुके होते त्यादिवशी. वा! काय वर्णन करू, असे वाटत होते आपण कुठे तरी वेगळ्याच ठिकाणी आहोत. जिथे ढग उतरून खाली जमिनीवर आलेत आपल्या भोवती फक्त ढगच आहे आण...