पानशेत धरण फुटले...
दोन दिवस आधीपासून पुढच्या संकटाची माहिती आकाशवाणी, वृत्तपत्रातून दिली जात होती. परंतु, कोणत्याच पुणेकराला संकटाचे गांभीर्य लक्षात आले नव्हते. ती सकाळ होती, १२ जुलै१९६१ या दिवशीची. पुणे आणि पुणेकर यांचा नित्यक्रम सुरू झालेला होता..... आणि अचानक बातमी आली पानशेत धरण फुटले. . क्षणभर कोणालाच काहीच सुचेना .... त्यावेळेस आम्ही फुटक्या बुरुजपाशी राहत होतो. नात्यात शुभकार्य असल्यामुळे मी २-३ दिवस आत्याकडे राहायला सदाशिव पेठेत गेलो होतो. आई आणि बहीण ११ जुलैला घरी गेल्या होत्या. १२ जुलै चा दिवस उजाडला तो संकटाची नांदी घेऊनच. आदल्या दिवशी वडील परगावी गेले होते. ही बातमी पुण्यात सर्वत्र पटकन पसरली. बातमी कळताच काकांना परिस्थितीची कल्पना आली आणि ते धावतच शनिवार वाड्याकडे निघाले. एव्हाना पाणी पसरायला सुरूवात झाली होती. बघता बघता पाणी कंबरेपर्यंत आले होते. काकांनी आई आणि बहिणीची सुटका केले पण शनिवार वाड्यापलीकडे राहणाऱ्या आत्याकडे त्यांना जाता आले नाही कारण पाण्याची पातळी खूप वाढली होती. वडीलांपर्यंत ही बातमी पोहोचायला दुपार झाली. पण त्यांना लगेचच सार्वजनिक वाहतुकीचे कोणतेच साधन न म...