Posts

Showing posts from January, 2022

नवीन वर्षाची सुरूवात

Image
  नवीन वर्षाची सुरूवात जरा मस्त करूयात असे मनी योजिले होते पण हात दुखीने त्रस्त मी! त्यामुळे खूप काही मोठे नियोजन नाही करता आले किंवा तडीस नाही नेता आले म्हणणे योग्य. पण त्यातूनही काही तरी वेगळे म्हणून नवीन वर्षाची सुरुवात आपण सूर्योदय बघून करूयात असे वाटले. बऱ्याच जणांच्या स्टेटसला २०२१ चा शेवटचा सूर्यास्त मी पहिला. पण मला सूर्योदय बघायला मनापासून आवडते. मग पुण्यातल्या पुण्यात काय बघावे. तशा टेकड्या आहेत पुण्यात पण त्यातली कोणती तर आम्ही निवडली बाणेर हिल्स. बाणेरला एके ठिकाणी आत वळून थोडे अंतर कापलं की टेकडीची वाट सुरू होते. गाडी लावून आम्ही चढायला सुरुवात केली. चढताना वाटले छोटीच आहे. पण जस जसे वर चढत गेलो तेव्हा बऱ्यापैकी उंच आहे हे जाणवले. गर्दी म्हंटले तर होती म्हंटले तर नाही. कालचे जोरदार सेलिब्रेशन झाल्यामुळे आज पुण्याची सकाळ अर्थातच उशीर हे जातानाच जाणवत होते. काही लोक, काही कॉलेजियन्स मुले अर्थातच न्यू इयर सेलिब्रेशन करायला आली होती. नेहमीच दिसणारे दृश्य काही श्वानप्रेमी श्वानांना फिरायला घेऊन आलेली. वर चढून गेल्यावर एक ठिकाणी विस्तीर्ण जागा दिसली. तिथे जरावेळ थांबून आम्ही...