Posts

Showing posts from December, 2021

सिंहगड

Image
 सोमवार सकाळ, मुलाच्या हिवाळी सुट्टीचे दिवस सुरू होते. अचानक ठरले चला, आत्ता सिंहगडवर जाऊयात. मग काय पटापट आवरून तासाभरात बाहेर पडलो आणि निघालो. आज सिंहगड सर करून येऊयात. आत्तापर्यंत सिंहगडावर ९ वेळा मी गेले आहे. त्यात ४ वेळा गाडीने वर पर्यंत जाऊन मग तिथून सिंहगड पाहणे तर ५ वेळा पायथ्यापासून चढत जाणे. पुण्यात दर आठवड्याला जाऊन सिंहगड चढून येणारे बरेच जण आहेत. अगदी २० मिनिटात चढणारे ही बरेच जण आहेत. एक छोटी टेकडी मग एक मोठा डोंगर आणि मग आपण पोहोचतो सिंहगडावर. आज आम्ही पहिल्यांदाच आमच्या बाईकने सिंहगडच्या दिशेने कूच केले. आत्तापर्यंत आम्ही बसने सिंहगड पायथ्याशी जाऊन सिंहगड चढला आहे. आज निमित्त होते लेकाच्या शाळेत दिलेल्या उपक्रमाचे. हिवाळी सुट्टीत एक गड चढून या असे ताईंनी सांगितले आणि आम्ही ठरवला होता वेगळा गड पण काही कारणाने तिकडे जाणे जमले नाही म्हणून झटपट जाऊ सिंहगडावर असे ठरले. अर्थात चिरंजीव सकाळी आधी नाही म्हणाले. मग त्याला समजावून नेले. साधारण आम्ही सकाळी १०  वाजून ६ मिनिटांनी चढायला सुरूवात केली. हळूहळू चढत आजूबाजूचे छान छान शेते, झाडी बघत चढत होतो. अर्थात सावकाश. माझ्या...

सप्तश्रृंगी माता की जय🙏

Image
  आजचा ब्लॉग जरा हटके.         नेहमी भटकंती , माझे विचार मी लिहिते, मांडते. पण यावेळी देवदर्शन 🙏 आहे. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या वीकेंडला आम्ही नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवी च्या दर्शनाला जायचे ठरवले. एका रात्रीचा मुक्काम आणि दर्शन घेऊन परत पुणे असा बेत आखला. श्री सप्तश्रृंगी माता आमचे कुलदैवत. ही जगतजननी भक्तांना दर्शन देण्यासाठी या भूतलावर आलेली आई. हिचे भव्य दिव्यरूप डोळ्यात साठवून ठेवणे मनस्वी आवडते मला. शांत, किंचित हसरा चेहरा असा मला भासतो हिचा. मुळात तिचा चेहरा वेगळा आहे. असे वाटते की दारातून मंडपात जाताना ही आपल्याला म्हणते आहे या भक्तांनो या... आईची आठवण आली आणि तुम्ही मला भेटायला आलात मलाही आनंद झाला. आई काय वर्णू तुझा महिमा... आम्ही आणि आमच्यासोबत श्री व सौ सराफ आणि त्यांची सुकन्या असे आम्ही एकूण ६ जण होतो. चार मोठे दोन लहान. आम्ही शनिवारी सकाळी लवकर आपापल्या गाड्या घेऊन पुणे सोडले आणि नाशिकला प्रस्थान केले. आल्हाददायक वातावरण, सूर्योदयाला वेळ होता. आम्हाला असे वाटले होते की शनिवार रविवार मुळे ट्रॅफिक कमी असेल, तसेच परिवहन मं...

माझे (टी. पी.) निरीक्षण

Image
  घरात माझी आवडती जागा म्हणजे हॉलची खिडकी😀 मी कितीही वेळ इथे बसू शकते. सोसायटीची आतील बाजू आमच्या हॉलमधून दिसते. इथून मला बऱ्याच गोष्टी दिसतात. खेळाचे पटांगण, भरपूर झाडे, क्लब हाऊसचा परिसर वगैरे वगैरे. मी रोज सकाळी उठून ५ मिनिट तरी या खिडकीतून गंमत बघत बसते. शांत वातावरण, सुर्योदय , पक्ष्यांचे मधुर आवाज, त्यांचा किलबिलाट बरेच वेळा मला इथूनच 'भारतद्वाज'  पक्षाचे दर्शन घडते 😊 तो दिवस माझ्यासाठी आनंदाची परवणीच असतो. सकाळची काहींची फिरायला जाण्याची गडबड, गाड्या साफ करणारे, दुधवाले, पेपरवाले यांची धावपळ, कोणाकडचे कूकरच्या शिट्टीचे आवाज, तर कोणाची स्वयंपाकाची लगबग, सकाळी फिरून आलेले काही जण, कोणाची ऑफिसला जायची गडबड, तर कोणी लहान मुलांना चक्कर मारायला घेऊन आलेले, कोणाला पोहायला म्हणजे स्विमिंग हो जायची गडबड आणि रोज न चुकता दिसणारे दृश्य म्हणजे काही जण आपापल्या डॉगीला फिरायला आणतात🐶 ती गंमत तर निराळीच असते. कुत्र्यांच्या मूडप्रमाणे फिरायचे. त्याला हवे तिथे जायचे. कधी सावकाश चालायचे तर कधी त्यांच्या वेगाने धावायचे. कधी कधी समोरच्या दोन बिल्डिंगमधले दोन कुत्रे एकमेकांकडे बघून भुंकत ...