Posts

Showing posts from November, 2021

भटकंती भाग-२

Image
  तिथून पुढे आम्ही दाभोळला आलो. दाभोळ धोपवे फेरी बोट मार्गाने आम्ही जेट्टी वर पोहोचलो. तिथली गाड्यांची गर्दी पाहून ' मेरा नंबर कब आयेगा ' 🤔असा विचार मनात आला. मुलांना तर हा अनुभवच वेगळा होता. आपण आपली गाडी घेऊन पलीकडे जायचे म्हणजे इथे तर खाडी ओलांडून जायला पुल पण नाही, मग कसे जाणार? पण जेव्हा त्यांनी फेरी बोट आणि त्यातून गाडी न्यायची हे पाहिले तेव्हा त्यांनी आनंदाने उडीच मारली. चला! चला! म्हणून त्यांची गडबड सुरू झाली. तिथल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत गाड्या एका मागोमाग एक बोटीत चढवल्या गेल्या. आधी मोठ्या गाड्या नंतर दुचाकी आणि मग सुरू झाला आमचा अदभुत पण छोटासाच प्रवास. १० मिनिटांची ती सफर काहीतरी वेगळा अनुभव देणारी होती. दुसऱ्या किनाऱ्याला जाईपर्यंत आम्ही फेरी बोटीचा मनमुराद आनंद घेतला. त्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर आम्ही पुढे गोपाळगड पाहण्यासाठी निघालो. कोकणातील लाल माती म्हणजे नक्की कशी हे आम्हाला इथे दिसले. दाभोळचा प्रसिद्ध असा एनरॉन प्रकल्प आम्हाला दिसला. त्याला वळसा घालून आम्ही अंजनवेलकडे निघालो. गोपाळगड पाहण्यासाठी आधी गेलो. इथे आमची जरा निराशा झाली. प्रचंड वाढले...

भटकंती

Image
  भटकंती हा विषय सर्वांच्याच आवडीचा असतो आणि अशा या भटकंती मध्ये जर जर अनपेक्षित काही समोर आले तर....😳😊 नमस्कार 🙏  माझा नवीन ब्लॉग.  भटकंती सगळ्यांना आवडणारी गोष्ट. मग ती कुठेही असो. फिरायला जायचे म्हंटले की सगळे एका पायावर तयार. गेले दीड दोन वर्ष कोरोना मुळे कुठेच जाता आले नाही. जशी सुट्टीची चाहूल लागली तसे पटपट नियोजन झाले. कोकण आवडीचे ठिकाण🌊 पण जास्त लांब नको म्हणून दापोलीच्या आसपास जायचे ठरले. ३ दिवसांचा दौरा. अगदी ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे आणि आमचा भाचा असे आम्ही चौघे सकाळी लवकर निघालो. ताम्हिणी मार्गे जायला आम्हाला आवडते. कारण कोकणात जायला सोयीचा मार्ग. पण यावेळी मात्र काही ठिकाणच्या रस्त्याने निराशा केली. दुपारपर्यंत आम्ही लाडघरला पोहोचलो. फ्रेश होऊन गरम गरम जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला. साधेच पण रुचकर असे कोकणातले जेवण म्हणजे नारळाचा पुरेपूर केलेला उपयोग असेच🥥 कोकण म्हणजे शांत आणि निवांत असे ठिकाण. संध्याकाळचा सूर्यास्त आणि समुद्र एकत्र पाहण्याचा आनंदच वेगळा. यावेळी कोकणात गर्दी भरपूर पाहायला मिळाली. समुद्रात खेळताना, ॲडवेंचर गेम्स खेळताना बरेच जण दिसले. घोडागाड...