मनाला वेड लावणारा रोहिडा
निसर्गाची मनसोक्त उधळण, मनाला थंडावा देणारा थंड गार वारा, उन सावलीचा चाललेला मन मानेल तसे खेळ.... आणि या प्रसन्न वातावरणात स्वतःचे अस्तित्व टिकवून मानाने उभा असणारा 'रोहिडा म्हणजेच विचित्रगड'. कोरोना चे अस्तित्व कमी होते आहे असे पाहून आम्ही रविवारी रोहिडा बघण्याचा कार्यक्रम आखला.. ३-४ जणांना विचारले पण काही कारणामुळे त्यांना जमले नाही मग नेहमीचे आम्ही तिघे. मी,अहो आणि लेक निघालो सकाळी ५.३० वाजता किल्ले रोहिडा सर करायला. पाऊस येतो का काय? असेच वातावरण होते. भाटघर धरणातून होणारा विसर्ग बरेच काही निसर्गाचे वर्णन सांगत होता. पुढे भोर मार्गे बाजारवाडी गावात पोहोचलो. बाजारवडी हे रोहिड्याच्या पायथ्याशी वसलेले गाव. तिथे आम्हाला अंकुश वाघ(धायकुले) यांच्याकडे न्याहारी मिळाली 'पोहे '. गरम गरम पोहे, ते खाऊन आम्ही गड चढायला सुरूवात केली. कधी ऊन तर कधी सावली... अशा या उत्स्फुत खेळत आम्ही गड चढत होतो...साधारणपणे १ तास आणि थोडा वर असा वेळ आम्हाला अर्थात माझ्या चालीने चढायला लागला. वर गेलो प्रवेशद्वार अर्थातच स्वागताला सज्ज होते. आत जाऊन उजव्या बाजूला असणाऱ्या बुरुजावर मी ठाण मांडून ...