आमची दक्षिण भारताची सहल भाग ३
संपूर्ण सहली मध्ये प्रत्येक प्रवासात आमच्या बरोबर एक जोडगोळी होती ती म्हणजे माझा भाऊ आणि माझा एक मामे भाऊ. आम्ही जेव्हा जेव्हा रेल्वेने प्रवास एका तेव्हा हे एकच बर्थ वर झोपले . कन्याकुमारीला असताना माझ्या दोन मामींनी माझी एक गोष्ट ऐकली ती म्हणजे जीन्स घाला असे मी त्यांना सांगितले तर मामींनी ते मान्य केली आणि त्यांनी जीन्स घातली. मला खूप आनंद झाला. मग सगळे लवकर आवरून देवी कन्याकुमारीच्या दर्शनाला गेलो. नुकतीच तिची पूजा झाली होती. देवीचे सात्विक रूप खूपच विलोभनीय आहे. सुवर्णालंकार तिच्यावर शोभून दिसत होते. माझे लक्ष वेधले ते मात्र तिच्या नथेमध्ये असणाऱ्या हिऱ्याने. शेजारीच लावलेली समाईची ज्योत त्या हिऱ्याला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला मदत करत होती. ते हिऱ्यामुळे देवीच्या चेहर्यावरील तेज किती तरी पटीने वाढलेले मला जाणवले. देवीचे दर्शन घेऊन आम्ही रॉक टेम्पल बघण्यासाठी निघालो. कन्याकुमारी देवीच्या मंदिरा बाहेरूनच तिथे जाण्यासाठी बऱ्याच लॉन्च आहेत. ती सोय खरच उत्तम आहे. आम्ही सगळे लॉन्च ने रॉक टेम्पल ला गेलो. एका संपूर्ण खडकावर केलेले ते बांधकाम मला खूप मनापासून आवडले. स्वामी विवेका...