आमची दक्षिण भारताची सहल भाग २
संपूर्ण रात्रीचा प्रवास करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मदुराईला पोहोचलो. स्टेशन जवळच एक उत्तम धर्मशाळा आम्हाला मिळाली. आम्ही तिथे जाऊन पटपट आवरून, न्याहारी करून पुढे कोडाई कॅनालला जायला निघालो. साधारण 3-4 तासाचा रस्ता आणि बराचसा घाटाचा. वळणं वळणं घेत आम्ही 17 सीटर गाडीने पुढे जात होती. आजू बाजूला सर्वत्र हिरवळ आणि शांत वातावरण अहाहा! उन्हाचा थोडा सुध्दा त्रास आम्हाला जाणवला नाही. मग कोडाई आले. सुरुवाती पासूनच वेगवेगळी हॉटेल्स दिसायला सुरू वाट झाली काही रस्त्याच्या शेजारी तर काही उंच डोंगरांवर. मला तर मुंबईला जाताना खंडाळा दिसतो तसेच काहीसे वाटले. हवेतला गारवा मनालही सुखावत होता. तिथले १-२ पॉइंट बघून आम्ही जेवणासाठी हॉटेल मध्ये गेलो अर्थातच पोळी नाही. पण पाहिजे तेवढा भात मिळाला किंवा फक्त भातचं मिळाला 😀 जेवण झाले मग एक जवळच मार्केट मध्ये फेरफटका मारायला आम्ही गेलो. तिथे भरपूर फळांची दुकाने होती. माझा एक मामा मला म्हणाला चल जरा आणि एका फळाच्या दुकानापाशी घेऊन गेला. तिथे फळवाल्याला १०-२० रुपये देऊन म्हणाला या पैशात जेवढी फळे येतील ती दे. त्याने आम्हाला ७-८ फळे दिली. आम्ही दोघांनी त...