पत्रलेखन
मागच्या वर्षी ऑक्टोबर२०२० मध्ये मुलाच्या शाळेत पालकांसाठी काही ऑनलाईन स्पर्धा झाल्या. नृत्य, चित्रकला आणि पत्रलेखन. यातील पत्रलेखन स्पर्धेत मी सहभागी झाले होते. माझ्या पत्रास द्वितीय क्रमांक मिळाला. ते पत्र पुढीलप्रमाणे ||श्री|| ऑक्टोबर २०२० प्रिय मानवा , सप्रेम नमस्कार कसा आहेस? अशा आहे तुझ्याकडे सर्व कुशल असावे. बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलायचे होते. या जीव सृष्टीनिर्मिती मध्ये मी तुझी (सर्वोच्च) निर्मिती केली. तू पण माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आला आहेस किंवा करतोच आहेस. अरे पण तुझ्या विज्ञानातील प्रगतीमुळे तू मला कुठे ना कुठे सतत दुखावतो आहेस. मी कधी कोणाला कृपाळू तर कोणाला क्रूर वाटतो आहे. तुझ्या म्हणण्यानुसार मी लहरी बनतो आहे. पण खरंचच तसे आहे का...