Posts

Showing posts from May, 2024

आनंदाचे क्षण म्हणजे काय रे भाऊ?

  आनंदाचे क्षण म्हणजे... कामत मध्ये कुरकुरीत डोसा खाणे कोल्हापूर राजवाडा वास्तू बघणे कोल्हापूरचे तिखट जेवणावर ताव मारणे  दुपारी झाडांच्या सावलीतून हिरवागार डोंगर बघत नागमोडी वळणे घेत जाणे भर उन्हाळ्यात नदीत डुंबणे माकड संघाचे थरारक River Crossing बघणे. दुपारी जमिनीवर गोल करून पत्ते खेळणे संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे रात्री घरगुती जेवणावर ताव मारणे  अंधारात आकाशात असंख्य तारे बघणे पहाटे उठून सदाहरित जंगलातून सफारी करणे सकाळी ढग आणि डोंगरांची सभा बघणे विविध वनस्पती आणि त्यांची फळे, पाने यांची माहिती घेणे आणि काही अंदाज लावणे भरपूर पक्षी आणि माकडां बरोबरच गवा, शेकरू,हरणटोळ बघणे जंगलात खाऊ बरोबर रानमेवा खाणे माहिती केंद्रात दाजीपूर जंगलाची माहिती जाणून घेणे फोंडा घाटातून जातांना आजूबाजूला निसर्गाची उधळण बघणे देवगड आणि दीपगृह बघणे पवनचक्की बरोबरच Animal Part 2 चा trailor बघणे MTDC मध्ये समुद्रावरील वारे अंगावर घेत भजी, चहाचा आस्वाद घेणे थोडा विरंगुळा म्हणून कॅरम खेळणे  मोकळ्या समुद्र किनाऱ्यावर प्रभात फेरी मारणे विजयदुर्गला बोटीतून फेरी मारण्याचा आनंद घेणे विजयदुर्ग बघतांन...