Posts

Showing posts from February, 2022

आजोबा, माझे आजोबा!

Image
 १-२ दिवसांपूर्वी, प्रा. वंदना जोशी यांची एक फेसबुक वरची पोस्ट वाचण्यात आली. ती पोस्ट वाचून मी माझे बालपण आठवण्यात हरवून गेले...... शिरूर घोडनदी काठी वसलेले टुमदार गाव. माझे माहेर यापेक्षा वेगळी ओळख काय सांगू? माझे बालपण, महाविद्यालयीन शिक्षण इथे झाले.  लहानपणापासून एक नाव माझ्या सतत सोबत असलेले म्हणजे गुरूवर्य गो. ना. वाघ , माझे आजोबा. माझ्या बाबांचे बाबा. लाडात वाढलेली मी पण घरात एक दरारा असायचा या नावाचा. हे नाव सांभाळताना एक दडपण मनावर सतत असायचे. आपली कोणतीही कृती या नावाला धक्का लागणार नाही याचे. पंचक्रोशीत हे नाव महत्वाचे होते ते आजोबांच्या कर्तृत्वामुळेच. १९५१ साली आजोबा पुण्यातील भारत हायस्कूल सोडून शिरूरला गेले ते कायमचेच...  मुख्याध्यापक म्हणून ते शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्रशाला या शाळेत रुजू झाले आणि ते शाळेचेच होऊन गेले. दिवसरात्र कष्ट करून त्यांनी शाळेचा नावलौकिक वाढविला. आजोबांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या ८ शाळा सुरू केल्या, एक महाविद्यालय सुरू केले. पुढे आय. टी. आय. व एक फार्मसी कॉलेज सुरू केले. मला आजोबांचा सहवास १४ वर्षे लाभला . या काळात ...