Posts

Showing posts from March, 2021

Children's Friendly Society

       Children's Friendly Society उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून जेमतेम आठवडाच झाला होता. सुट्टी लागल्यामुळे सुट्टीत बाहेर कुठे जायचे याचे प्लॅनिंग सगळ्या घराघरांतून सुरू होते. आज सकाळ पासूनच मुले खेळण्यात दंग होती. लपंडाव खेळत होती. आलोक, अमेय, सई, स्निग्धा, कौशिक, विराज,स्वप्ना सगळे लपले होते, राज्य मीनलवर होते. मीनलने सगळ्यांना शोधले पण एकटा विराज सापडायचा राहिला होता. काही वेळात विराज ही सापडला. मी पेपर वाचत होते. मुलांच्या मोठ्या आवाजावरून समजले की राज्य कोणावर यावरून गोंधळ सुरू आहे. इतक्यात कोणाचा तरी मोठ्याने बोलण्याचा आवाज कानी पडला. मुलांचा आवाज एकदम बंद झाला. क्षणभर अंदाज घेऊन दार उघडून मी बाहेर आले. तर शेजारचे दंडवते आजोबा मुलांना रागवत होते. "तुमच्या आवाजामुळे माझी झोप मोडते" मला बघून आजोबा मला सांगू लागले, "हे असे ओरडतात, मोठ्याने बोलतात, भांडतात, आता हे सहन नाही होत, छातीत धडधड होते, वयोमानानुसार गोष्टी सहन होत नाहीत आता. आता तर यांना सुट्टी लागली आहे आता हे रोज असे खेळणार, आरडाओरडा, गोंधळ नुसता."  हे सगळे ऐकून मी गप्पच झाले. कोणाला आणि काय बोलू. कळ...

एक रविवार फक्त राजगड

शनिवारी संध्याकाळ येते ती रविवारचे नवीन बेत घेऊनच. मग काय चर्चा आणि शेवटी एखादा गड चढून येणे. मग ठरवते, चला उद्या किल्ला चढून येऊ. मग कोणते कोणते एक दिवसात होणारे आहेत ते आधी पाहिले. मग ठरले की राजगड किंवा सिंहगड. आम्ही तिघे आणि भाचा असे आम्ही चौघे जाऊयात असे नक्की झाले. मग काय रविवार सकाळ काही तरी नवीन घेऊन आली. सकाळी बरोब्बर ६.१० ल घरून निघालो.बरोब्बर ७.३० पर्यंत राजगड च्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो. कडाडून भूक लागली होती मग पोहे खाल्ले. काहीही गरम खायला मिळाले की बस तूट पडो. त्यानंतर मिशन चढण आणि निघालो गड चढायला. जरा चढून वर गेलो आणि समोर पाहिले तेव्हाच वाटले अरे कुठे आलो आपण. मग काय १६ व्या मिनिटालाच मी वैतागले आणि नवऱ्याला म्हणाले "उगाच आले मी". मग काय तोही चिडला आणि म्हणाला "जा मग इथूनच परत." जरा चिडचिड झाली पण चालणे सुरूच होते. तो अधे मधे सांगत होता आता जरा चढण आहे मग सपाट आहे पुढे मग सरळ चालायचे आहे . परत थोडे पुढे गेल्यावर आता चढण झाली की परत सपाट आहे." अरे देवा किती चालायचे ते" मनात सारखे हेच होते. त्यात चढायला सुरुवात केली आणि माझे फ्लोटर्स नी ...